सिंहगडावर जवळपास ५० पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला

0
slider_4552

पुणे :

पुण्यात सिंहगडावर जवळपास 50 पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. सिंहगडावरील तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. हल्ल्यात अनेक तरुण-तरुणी गंभीर जखमी झालेआहेत. त्यातील बेशुद्ध पडलेल्या पाच ते सहा जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये दहशत पसरली आहे.

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासूनच सिंहगडावर पर्यटकांनी मोठी गर्दी होती. अशातच मधमाशांनी हल्ला केल्यानं पर्यटकांची मोठी धावपळ झाली. गडावर मधमाशांच्या हल्ल्याच प्रमाण वाढल्यानं, गडावर येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

पर्यटक सिंहगड किल्ल्यावर फिरत असताना टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात मधमाशांचा थवा आला. यावेळी येथे उपस्थित असलेल्या पर्यटकांवर या मधमाशांनी हल्ला केला. यामुळे पर्यटक गोंधळले. भयभित झाले. सरैवैरा पळू लागले. मधमाशांच्या हल्ल्यात पाच ते सहा जण बेशुद्ध देखील झाले. तर, अनेक जण जखमी झाले. तात्काळ सर्व पर्यटकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

See also  अंगणवाडी सेविका खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करतात. : अजित पवार