एमएनजीएलच्या पाइपलाइनला आग

0
slider_4552

पुणे :

वाणोरी येथील साळुंके विहार रोडवर असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) पाइपलाइनला भीषण आग लागली. नाला पार्कजवळील पाइपलाइनला आग लागली, त्यामुळे रहिवासी आणि अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वानोरी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप जगताप यांनी तात्काळ MNGL प्रतिनिधीला आग विझत नाही, तोपर्यंत गॅस पुरवठा बंद ठेवण्याची सूचना केली.  पुरवठा पुन्हा सुरू करण्यापूर्वी आवश्यक खबरदारी घेतली गेली.

महाराष्ट्र काँग्रेसमधील ओबीसी सेलचे उपाध्यक्ष साहिल केदारी यांनी या घटनेत एका वाहनाचेही नुकसान झाल्याची माहिती दिली. पुढील कारवाईसाठी अग्निशमन दल आणि एमएनजीएल टीमला घटनेची माहिती देण्यात आली.

एमएनजीएल पाइपलाइनमधून गॅस गळतीमुळे ही आग लागल्याचे पुणे अग्निशमन दलाने स्पष्ट केले. आग आटोक्यात आणण्यासाठी कोंढवा अग्निशमन केंद्राच्या पाच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेमुळे तात्पुरती वाहतूक कोंडी झाली होती.

See also  विद्यार्थ्यांनी जीवनमूल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञान दोन्ही आत्मसात करावे-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी