प्रशासनाची वाट न बघता भुगावकरांनी बुजवले रस्त्यावरील खड्डे…

0
slider_4552

भूगाव :

भुगाव मधील वाहतूक कोंडी समस्या उद्भवण्यासाठी अनेक कारणे आहेत. त्यातील मुख्य कारण रस्त्यावर असणारे छोटे-मोठे खड्डे आणि या खड्ड्यांमुळे स्वभाविक गाडीचा वेग कमी होतो किंवा खड्डा चुकविण्यासाठी गाडी दुसऱ्या लेन मध्ये येतात. त्यामुळे ट्राफिक होत असल्याचे अनेक निरीक्षणांवरून लक्षात आले. त्यामुळे प्रशासनाची वाट न बघता भुगावकरांनी बुजवले रस्त्यावरील खड्डे.

या खड्डावर उपाययोजना करण्यासाठी म्हणून प्रशासकीय यंत्रणांची मदत न घेता किंवा त्यांच्याकडून अपेक्षा देखील न करता लोकसेवक अनिल करंजावणे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक /अध्यक्ष माजी उपसरपंच अक्षय सातपुते, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमित घारे, माजी सरपंच बाळासाहेब शेडगे, माजी सैनिक अनिल चोंधे, शाम घारे, युवा नेते कुमार शेडगे, प्रजय सातपुते, सूरज शेडगे, निखिल करंजावणे, किरण कड, रवींद्र शामल, संतोष कसाळ, परळकर आणि मित्र परिवाराने एकत्र येऊन आर एम सी प्लांटची एक संपूर्ण गाडी उपलब्ध केली. व भुगाव मधील असणारे खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला.

भूगाव परिसरातील वाहतुकीला अडथळे ठरत असलेले खड्डे तातडीने बुजवण्यात आले. यामुळे खड्ड्यांमुळे वाहतुकीची बंद पडत असलेली लेन सुरू झाली. परिणामी खड्ड्यांमुळे गाड्यांचा वेग कमी होत नव्हता तसेच खड्डा चुकवण्यासाठी कोणी लेन तोडत नव्हते. यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार व शोधलेल्या उपाययोजना याचा उपयोग झाला.

See also  सेवेच्या माध्यमातून संवाद वाढवा : चंद्रकांत पाटील