व्हॉट्स ॲपवरून काढा मेट्रोचे तिकीट

0
slider_4552

पुणे :

मेट्रोचा दुसरा टप्पा आज (मंगळवार, दि. 1) पासून सुरु झाला आहे. यामुळे पिंपरी मधून थेट पुणे रेल्वे स्थानक आणि रुबी हॉल पर्यंत जाता येणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही दोन्ही शहरे एकमेकांना जोडली गेल्याने मेट्रोला प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मेट्रोकडून नागरिकांना तिकिटासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातच एक पर्याय व्हॉट्स ॲप तिकिटाचा आहे.

असे काढा मेट्रोचे व्हॉट्स ॲपद्वारे तिकीट

पुणे मेट्रोचा *__9420101990_* हा व्हॉट्स ॲप क्रमांक सेव्ह करा

पुणे मेट्रोच्या व्हॉट्स ॲप क्रमांकावर इंग्रजीत ‘Hi’ असा मेसेज पाठवा

ओटीपी असलेला एक मेसेज येईल. त्यातच तिकीट तिकीट व्हेंडिंग मशीनवर ओटीपी देऊन तिकीट काढण्याचा अथवा थेट लिंकद्वारे मोबाईल मधून तिकीट काढण्याचा पर्याय येईल

Book Now’ या पर्यायावर क्लिक करा.

कुठून कुठवर जायचे आहे, याची माहिती द्या. तसेच प्रवास एकमार्गी की परतीचा करायचा आहे, हेही निवडा

त्यानंतर त्या प्रवासासाठी तुम्हाला किती तिकीट लागणार आहे, हे समजेल. त्यावर क्लिक केल्यास उपलब्ध असलेल्या पेमेंट गेटवे मध्ये जाता येईल

वेगवेगळ्या युपीआय आणि ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून पेमेंट करता येईल पेमेंट यशस्वी होताच व्हॉट्स ॲपवर तुमचे तिकीट येईल. त्या तिकीटावरील क्यूआर कोड वापरून तुम्हाला मेट्रोमधून प्रवास करता येईल.

See also  १० वी१२ वीच्या गुणवंतांना पुणे महापालिके कडून ५१ हजार रुपये देण्यात येणार