वो डरा नही.. झुका नही.. प्यार की राह पे, न्याय मांगता चला.. राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी.

0
slider_4552

राहुल गांधींना खासदारकी पुन्हा बहाल, सुप्रीम कोर्टाच्यानिर्णयानंतर लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना

दिल्ली :

देशातील राजकारणातील एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी याना त्यांची रद्द करण्यात आलेली खासदारकरी पुन्हा एकदा बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने तशी अधिसुचना काढली आहे.

‘मोदी आडनाव प्रकरणी’ राहुल गांधी यांना सुरत कोटनि 2 वर्षाची शिक्षा सुनावल्याने लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रह केली होती. परंतू, दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेवर प्रश्न उपस्थित करत शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे आता लोकसभा सचिवालयाने एक अधिसुचना जारी करत कॉग्रेस नेते राहुल गांधी याना खासदारकी पुन्हा एकदा बहाल करतअसल्याचे सांगितले.

या निर्णयामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकत्य्यामध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. राहुल गांधी हे केरळ राज्यातील वायनाड़ येथून लोकसभेचे खासदार बनले आहेत.

See also  विमान प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक नाही