पुण्यात साथीच्या रुग्णांमध्ये वाढ; रुग्णांच्या उपचारासाठी मनसेचे आंदोलन

0
slider_4552

पुणे :

पुणे शहरातील विविध भागात डेंगू, मलेरिया, चिकन गुण्या यासारख्या साथीच्या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्या आजाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत. या मागणीसाठी आज पुणे महापालिके समोर मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी साईनाथ बाबर म्हणाले की, पुणे शहरातील भागात डेंगू, मलेरिया, चिकन गुणिया यासारख्या साथीच्या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. तर दुसर्‍या बाजूला महापालिकेची आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. या विभागा मार्फत कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नाही

त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यात रुग्णांना रक्त तपासणी करतेवेळी खासगी लॅब चालक मोठ्या प्रमाणावर पैसे घेत असून नागरिकाची एक प्रकारे लूट होत आहे. या सर्व बाबीवर महापालिका प्रशासन नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे.

त्यामुळे आज आम्ही महापालिके समोर आंदोलन करित आहे. या आंदोलनाची दखल महापालिका विक्रम कुमार यांनी घ्यावी अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला

See also  सर्वांना विश्वासात घेऊनच ‘बालगंधर्व’ पुनर्विकासाचा निर्णय : महापौर मुरलीधर मोहोळ