गरिबांच्या कल्याणासाठी राज्यातील शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न : फडणवीस

0
slider_4552

संभाजीनगर :

गरिबांच्या कल्याणासाठी राज्यातील हे शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तळागाळातील गोरगरीब माणसांपर्यंत आरोग्य सुविथा पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाआरोग्य शिबिराच्या उद्धाटन प्रसंगी म्हणाले आहेत.

अयोध्यानगरी मैदानावर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्धाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, महाआरोग्य आरोग्य शिबीर
सामान्य माणसाला असाध्य आजारावरील तपासणी व उपचार मोफत करण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात साडेतीन लाख नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी झाली हा एक उच्चांक आहे. या शिबिरासाठी विविध दानशूर व्यक्ती,संस्था, वैद्यकीय तद्न
यांचे महत्तवपूर्ण योगदान आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुर्धर आजारावरील औषधाच्या किंमती कमी करून सर्वसामान्य लोकांना उपचार स्वस्त केले आहेत. सर्व देशवासियांना कोविडची लस मोफत देण्यात आली. देशात अडीच लाख ‘वेलनेस सेंटर च्या माध्यमातून गरीब लोकांवर उपचार करण्यात
येणार आहेत. पंतप्रधान आरोग्य कल्याण निधीतून वैद्यकीय
उपचारासाठी मदत मिळते. वयोश्री योजनेतून वयोवृूद्धांना उपचार सहाय्य साहित्य मोफत दिले जाणार अहे.
राज्य शासनानेही महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यतचे वैद्यकीय उपचार मोफत होणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना उपचार मिळणार आहेत. आता ही योजना राज्यातील 12 कोटी जनतेला लागू असणार
आहे. आरोग्य सेवेचा अधिक विस्तार करण्यासाठी शासनाने राज्यात 14 वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्यातील 11 वैद्यकीय महाविद्यालये सुरु झाली आहेत. उर्वरीत तीन लवकरच सुरु होतील, असे फडणवीस सांगितले.

See also  वैमानिक प्रशिक्षण साठी दोन विमाने जळगावात दाखल..