जळगाव :
मंजूर झालेल्या जळगाव विमानतळावरील वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी स्कायनेक्स एरिओ कंपनीतर्फे प्रदेशातील गुंज येथून दोन विमाने जळगाव विमान तळावर उतरविण्यात आली




या विमानांचे प्रशिक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी पूजन करून विमाने विमानतळ प्रशासनाकडे सुपूर्द केली.
जळगाव विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्राचे काम १०० टक्के पूर्ण झाले सध्या आहे. वैमानिक प्रशिक्षण केंद्राची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती संचालक आदित्य भारद्धाज यांनी दिली. येत्या महिनाभरात सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन. यावेळी जळगाव विमानतळाचे संचालक सुनील मुगरीवार, प्रशिक्षण संस्थेचे कॅप्टन कोशिंग कुंदन, कॅप्टन अन्विता त्रिवेदी उपस्थित होते.
एका पायलटचे २०० तासांचे प्रशिक्षण
वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यावर प्रथम वर्षांत ३० ते ६० विद्यार्थांची तुकडी राहणार आहे. एका विद्यार्थाला परिपुर्ण वैमानिक होण्यासाठी वर्षभरात २०० तासांचे विमानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बाहेरील राज्यातील विद्यार्थांसाठी संस्थेतर्फे जळगाव शहरात राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.








