कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघातत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

0
slider_4552

कात्रज :

कात्रज-कोंढवा रस्त्यावर पुन्हा रविवारी रात्री (ता. १३) अपघात झाला. माऊली नगर चौकात झालेल्या अपघातात प्रभावती पांडुरंग अनभुले (वय ७० रा. विग्नहर्तानगर) या महिलेचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली.

दहाच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पादचारी महिलेला उडविले. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन पळून जात होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला ट्रकसह कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत ताब्यात घेतले. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

कात्रज-कोंढवा रस्त्यावर एका आठवड्यात तिसरा भीषण अपघात झाला असून तिसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाजगी कार्यालयात एका कार्यक्रमासाठी ही महिला गेली होती. कार्यक्रम संपून घरी माऊली नगरकडे जात असताना मुख्य रस्त्यावर टँकरने उडवले. या अपघातात सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

See also  पुण्यदशम बसने प्रवास करताना आधारकार्ड मागू नये : महापौर मुरलीधर मोहोळ