पुणे :
संस्थेची गुणात्मक वाढ हा सरांचा आशीर्वाद डाॅ गजानन एकबोटे, कार्याध्यक्ष, पी ई सोसायटी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘ज्ञानव्रती गुरूवर्य पद्माकर सदाशिव चिरपुटकर सर’ यांच्या ज्ञानव्रती या स्मृतिग्रंथाचा’ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा डाॅ नितीन करमळकर, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डाॅ अरविंद पांडे, उपकार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, प्रा शामकांत देशमुख, कार्यवाह, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, प्रा डाॅ जोत्स्ना एकबोटे, सहकार्यवाह, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, प्रा सुरेश तोडकर, सहकार्यवाह, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, प्रा डाॅ निवेदिता एकबोटे, उपकार्यवाह, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, प्रा डाॅ प्रकाश दिक्षित, उपकार्यवाह, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी यांच्यासह विशेष उपस्थिती डाॅ सुचित्रा केळकर व डाॅ संदीप केळकर व केळकर, मेहता व चिरपुटकर सरांचे सर्व नातेवाईक यांची होती. कार्यक्रमाची सुरवात स्वाती पटवर्धन यांनी गायलेल्या ‘ हीच आमुची प्रार्थना’ या गीताने झाली.




ज्ञानव्रती या पुस्तकांचे संपादन डाॅ पांडे यांनी केले. या पुस्तकामधे एकुण ४८ लेख असुन १५६ पानांच्या या ग्रंथाचे यशोवाणी संस्थेतर्फे आडिओ बुकही करण्यात आले आहे.अभिरुची प्रकाशनतर्फे हा स्मृतीग्रंथ प्रकाशित करण्यात आला. डाॅ सुचित्रा केळकर,आदरणीय चिरपुटकर सर यांची कन्या यांनी कार्यक्रमासाठी संस्थेचे ऋण व्यक्त केले. डाॅ जोत्स्ना एकबोटे यांनी आपल्या संस्थेतील कार्याचे श्रेय चिरपुटकर सरांना दिले. शांत, दिलदार,प्रेमळ,शिस्तप्रिय असे चिरपुटकर सर होते. त्यांना माणसाची पारख होती असे अदरांजली देताना डाॅ पांडे म्हणाले.
डाॅ नितीन करमळकर म्हणाले, एका संस्थेच्या उभारणीमधे सर्वात महत्वाचा घटक हा माणसे असतो. ते हि संस्था मोठी करतात. चिरपुटकर सर यांचे ऋण मोठे आहे. हा स्मृतीग्रंथ हा सरांच्या ऋणात राहण्यासाठीच आहे.
संस्थेचे कार्यवाह डाॅ एकबोटे अध्यक्षीय भाषण कराताना म्हणाले, संस्थेच्या अतिशय कठिण व किचकट काळात चिरपुटकरसर आधारस्तंभ होते. त्यांच्यासारखा निस्वार्थी शिक्षकाच्या अशिर्वादामुळे संस्थेची गुणात्मक वाढ झाली आहे. चांगला शिक्षकवर्ग, संस्कारक्षम वातावरण हा आशीर्वाद आहे. सरांसारखा एकनिष्ठ कार्यकर्ता व सहकार्याला माझी आदरांजली आहे.
याप्रसंगी गणित व संख्याशास्त्रामधे पहिला येणार्या विद्यार्थ्याला रु १,००,००० फंड संस्थेने ठेवला आहे असे डाॅ एकबोटे सरांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ निवेदिता एकबोटे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा शामकांत देशमुख यांनी केले. प्रा डाॅ प्रकाश दिक्षित यांनी
चिरपुटकर सरांना सहाय्य केलेल्या व या स्मृतीग्रंथाला मदत केलेल्या सर्व सत्कारार्थींच्या नावाचे वाचन केले. प्रा समीर नेर्लेकर यांनी तयार केलेल्या ध्वनीचित्र फित सादर करण्यात आली. पसायदान क्षिप्रा माऊसकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा डाॅ वैजयंती जाधव यांनी केले.आभार प्रदर्शन डाॅ संदीप केळकर यांनी केले.
कार्यक्रमाला नियामक मंडळाचे सर्व सदस्य, संस्थेच्या सर्व शाळा, संस्था व महाविद्यालये सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.








