औंध :
श्रीरामरक्षा पठण व ज्येष्ठ स्वयंसेवक अविनाशजी भाजेकर यांच्या हस्ते आरती करून औंध श्रीराम मंदिर चे मालक पुराणिक बंधू यांच्याकडून पहिला निधी स्वीकारून समर्पण निधी शुभारंभ करण्यात आला.




या प्रसंगी पुराणिक बंधू निधी स्वीकारताना अभिषेक तोडकर , माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, रवींद्र साळेगावकर, गणेश कलापुरे, वसंत जूनवने, विकास रानवडे, सुप्रीम चोंधे, हेरंब कलापुरे, समीर जूनवने, सिद्धेश पाटील, गणेश नायकरे, नितीन बहिरट आणि अनेक रामसेवक महिला नागरिक उपस्थित होते.
औंध निधी संकलन कार्यालय उद्घाटन करण्यात आले आणि औंध श्रीराम मंदिर ते परिहार चौक श्रीरामनाम जप व जागर केला. कार्यक्रमाची सांगता करताना गणेश कलापुरे यांनी सर्वांना संबोधन करताना म्हटले, राम मंदिरा साठी निधी कमी पडणार नाही, पण या समर्पण संकलन च्या निमित्त या साठी बलिदान देणाऱ्याचे स्मरण आपण करू आपले जीवन देणाऱ्या साठी श्रद्धांजली म्हणून आपण आपला वेळ देऊ तन मन धन समर्पण करू सर्व जनात आणि मनात राम जागवू राम नामाने सर्वत्र समरसता आणू.









