कॉन्स्ट्रो इंटरनॅशनल एक्स्पो 2024 ची नोंदणी सुरु 

0
slider_4552

पुणे :

पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग रिसर्च फाउंडेशन (PCERF), कन्सेप्ट पार्टनर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) सोबत 4 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान कॉन्स्ट्रो इंटरनॅशनल एक्स्पोच्या 18 व्या आवृत्तीचे आयोजन करत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) कॉन्स्ट्रो 2024 साठी सहयोगी भागीदार म्हणून सहकार्य करत आहे.

हे प्रदर्शन PMRDA चा अत्याधुनिक पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र मोशी (इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर ) (पीआयईसीसी)येथे होणार आहे. ३० हजार चौरस मीटर जागेवर हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

बांधकाम उद्योगातील अद्ययावत यंत्रसामग्री, साहित्य, पद्धती आणि तंत्रज्ञान प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे.

प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सर्व विभागातील बांधकाम व्यावसायिकांसाठी प्रदर्शन ही एक उत्तम संधी असेल. हे प्रदर्शन आर्किटेक्चर आणि स्थापत्य अभियांत्रिकी व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना नवीन विकास कामे, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीनतम बांधकाम उपकरणे व साहित्य समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.

कॉन्स्ट्रो प्रदर्शनासोबत बांधकाम उद्योगाशी संबंधित विषयांवर चर्चासत्र आयोजित केले जाईल. ज्यामध्ये बांधकाम क्षेत्रातील नामवंत तज्ञ व प्रख्यात वास्तुविशारद त्यांचे विचार मांडतील. तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकासाठी प्रात्यक्षिक क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून, सुरक्षा प्रात्यक्षिकही आयोजित करण्यात येणार आहे.

प्रदर्शनाच्या आयोजनाची अधिकृत घोषणा दि. 25 ऑगस्ट 2023 रोजी चिंचवड येथे, महानगर आयुक्त आणि PMRDA चे CEO  राहुल रंजन महिवाल (IAS) आणि PCMC महापालिकेचे अप्पर आयुक्त  प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीरिंग अँड रिसर्च फौंडेशन (PCERF) चे अध्यक्ष विश्वास लोकरे, यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. कॉन्स्ट्रो 2024 चे अध्यक्ष जयंत इनामदार यांनी कॉन्स्ट्रो 2024 च्या ठळक वैशिष्ट्यांवर चर्चा केली. शिरीष केंभवी, मा. सचिव PCERF यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन PCERF चे मनोज देशमुख यांनी केले.

याप्रसंगी व्हर्च्यूअल कॉन्स्ट्रो प्रदर्शनाचीही घोषणा करण्यात आली.

कॉन्स्ट्रो 2024 प्रदर्शन 4 जानेवारी 2024 पासून पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (पीआयईसीसी) मोशी येथे होणार आहे. यावेळी PMRDA चे सह आयुक्त बन्सी गवळी , श्रीमती स्नेहल बर्गे , सुनिल पांढरे , महानगर आयुक्तांचे ओएसडी रामदास जगताप , उप आयुक्त मनिषा कुंभार व प्रविण ठाकरे , तहसिलदार अभिजीत जगताप , अधिक्षक अभियंता श्री बागडी व उप अभियंता श्रीमती पाटील उपस्थित होते.

See also  मराठा क्रांती मोर्चातील 109 खटले मागे घेणार : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील