अजितदादांच्या बैठकीकडे चक्क मित्र पक्षाच्या खासदार, आमदारांनीच फिरवली पाठ

0
slider_4552

पिंपरी चिंचवड :

शिवसेना-भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच महापालिका प्रशासनासोबत बैठक घेतली. पण, या बैठकीकडे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी बैठकीकडे पाठ फिरविली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

अजित पवार शहरात आले की शिवसेना, भाजपावर सडकून टीका करत होते. भाजपाच्या महापालिकेतील कारभारावर प्रश्न निर्माण करत होते. त्याला भाजपाकडूनही उत्तरे दिली जात होती.

आता पवार शिवसेना-भाजपाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनासोबत होणाऱ्या बैठकीला शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपा आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे हे उपस्थित राहतील, अशी शक्यता होती. पण, त्यांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

See also  आकुर्डीत कॉलेजसमोर विद्यार्थ्यावर कोयत्याने वार