बाणेर :
श्री बाणेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून संपूर्ण श्रावण महिन्यात या श्रावण मास हा धार्मिक उत्सव साजरा केला जातो. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये लघुरुद्र अभिषेक, महारुद्र अभिषेक, संकल्प पूजा, शिवयोग स्वाध्याय, किर्तन आधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री बाणेश्वर मंदिरात पहिला श्रावणी सोमवार व नागपंचमी मुळे मंदिरास फुलांची आकर्षक आरास तसेच नागदेवता शृंगार अशी सजावट करण्यात आली होती.
बणेश्वर मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व…







बाणेरच्या तुकाई टेकडीवर इसवी सन १२०० शतकातील पांडवकाली स्वरूपात असलेले श्री बाणेश्वर मंदिर आहे. बाणेश्वर बाणेर बालेवाडीकरांचे आराध्य दैवत आहे . गुफा स्वरुपातील मंदिरात नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत असून या पाण्याने बाणेश्वरास अभिषेक केला जातो. बाणेर गावात भैरवनाथ मंदिराच्या दक्षिणेस तुकाई टेकडीवर हे मंदिर असून, यातील शिवलिंग पांडवांनी स्थापले असल्याची अख्यायिका सांगितली जाते. या नावावरूनच बाणेर हे नाव पडले असल्याचेही बोलले जाते.

पहिलल्या श्रावणी सोमवार निमित्त या ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी विनामूल्य खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती. याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक श्रावणी सोमवारी ही आकर्षक सजावट करून भक्तांच्या दर्शनासाठी व होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी व्यवस्था ट्रस्ट तर्फे करण्यात येणार आहे.
या धार्मिक विधी व अभिषेक चा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन श्री बाणेश्वर सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष संदीप वाडकर यांनी केले आहे.








