स्थगिती च्या आदेशानंतरही होल्डिंग चे काम सुरू..

0
slider_4552

पुणे :
टिळक चौकात संभाजी पोलिस चौकीच्या मागे नियमाचे उल्लंघन करून आलेल्या होर्डिंगचे काम थांबवून तेथे जाहिरात करू नये असे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. त्यानंतरही संबंधित व्यावसायिकाने होर्डिंगचे काम केल्याचे समोर आले आहे.

राज्य सरकारने २०२२ मध्ये आकाश चिन्ह विभागाची नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये दोन होर्डिंगमध्ये एक मीटरचे अंतर असणे आवश्‍यक असते. पण या ठिकाणी तीन होर्डिंग एकमेकांना खेटून उभारले आहेत.

हे काम सुरु असताना कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे परवाना निरीक्षक, सहाय्यक आयुक्तांकडूनही त्यावर हरकत घेण्यात आलेली नाही. यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रार गेल्यानंतर संबंधित होर्डिंगचा अतिरिक्त आयुक्त डॉ. खेमनार यांनी अहवाल मागविला तसेच या होर्डिंगच्या ठिकाणी कोणतेही काम केले जाऊ नये असे आदेश दिले होते.

क्षेत्रीय कार्यालयाने सर्व माहिती आॅनलाइन उपलब्ध असूनही अहवाल तयार केलेला नाही. शिवाय होर्डिंग व्यावसायिकाने होर्डिंगचा वापर करून जाहिरात लावण्याची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात खेमनार म्हणाले, ”होर्डिंगचा अहवाल मागविला आहे, या ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी करून पुढील कारवाई केली जाईल.”

See also  २०२२ ला शासनाच्या प्रत्येक खात्यात इलेक्ट्रॉनिक गाडया : आदित्य ठाकरे