आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार; १२३ गावाचा जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातुन एल्गार

0
slider_4552

जालना :

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उद्या जालना आणि बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या १२३ गावाच्यावतीने पुन्हा एकदा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाच्यावतीने या मोर्चासाठी जय्यत तयारीही करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठीअनेक वेळा आंदोलन करुन ही सरकार आश्वासनाची पूर्तता करत नसल्याने व मराठा समाजाला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण देण्यात यावं; या मागणीवर मराठा समाज आपल्या भूमिकावर ठाम आहे. त्यासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणसाठी १२३ गावातील मराठा समाजाचा एल्गार पुकारला आहे.

मराठा आरक्षणासाठी उद्या पुन्हा मोचर्चा काढण्यात येणार आहे. या दृष्टीने प्रशासनाच्यावतीने ही या मोर्चाच्या पार्शभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त शहागड परिसरात तैनात केला आहे. आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा सामाज मोठ्या संख्येने एकवटणार आहे.

See also  पशुपालन, दुग्ध व्यवसाय ९० टक्के कर्ज आणि ३ टक्के व्याज सवलत मिळणार : सुनील केदार