घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात बुधवार पासून २०० रुपयांची कपात

0
slider_4552

दिल्ली :

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती दोनशे रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार मोठं पाऊल उचलले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई कमी करण्यासंदर्भात विधान केलं होतं. केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये घट करण्याचा निर्णय घेतलेला असून उद्यापर्यंत त्याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

देशभरातील महिलांना मोदी सरकारने राखी पोर्णिमेच्या एक दिवस आधी मोठं गिफ्ट दिलं आहे. बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या 200 रुपयांनी कमी होणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, ओनम आणि राखी पोर्णिमेच्या निमित्ताने मोदी सरकारने देशभरातील महिलांना गिफ्ट दिलं आहे. बुधवारपासून देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 75 लाख भगिनींना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे. त्यासाठी त्यांना एक रुपयाही द्यावा लागणार नाही. पाईप, स्टोव्ह आणि सिलिंडरही मोफत मिळेल. जगभरात गॅसच्या किमती वाढल्या आहेत, मात्र भारतात त्याचा परिणाम कमी आहे.

See also  राज्यांना पाच वर्षांचा थकीत जीएसटी परतावा मिळणार : अर्थमंत्री निर्मला सीतारामन