पुणे विमानतळावर आता १० रुपयांत चहा, २० रुपयांत वडापाव…

0
slider_4552

पुणे :

उडान याेजनेच्या माध्यमातून छाेटी व माेठी शहरे एकमेकांशी जाेडली जात आहे. या याेजनेच्या माध्यमातून दीड काेटी नागरिकांनी मागील दाेन ते अडीचवर्षात प्रवास केला आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी याबाबत पुढाकार घेतल्याने विमान प्रवास सर्वसामान्यांचे आवाक्यात आला आहे. केंद्राचे अर्थसंकल्पात अर्थमंत्री यांनी उडाण याेजना पुढील दहा वर्ष कायम ठेवणार आहे. पुढील पाच वर्षात चार काेटी लाेक या याेजनेतून प्रवास करतील. विमानतळावर सर्वसामान्य प्रवाशांना खाद्य पदार्थ महाग मिळतात अशा तक्रारी येत हाेत्या. त्यानुसार उडाण याेजने प्रमाणे उडाण यात्री कॅफे सुरु करण्यात आले. कलकत्ता, चेन्नई, अहमदाबाद, याठिकाणी हे कॅफे सुरु झाले असून आता प्रवाशांना याचा लाभ पुणे विमानतळावर देखील मिळणार आहे. २० रुपयात काॅफी, सामाेसा, मिठाई , दहा रुपयात चहा, पाणी बाॅटल प्रवाशांना उपलब्ध हाेईल अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली. लवकरच ही याेजना मुंबई विमानतळावर देखील सुरु हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माेहाेळ म्हणाले, देशात दहा वर्षापूर्वी ७४ विमानतळ हाेते ती संख्या आज १६० पर्यंत वाढलेली आहे. पूर्वी लाेक एसटी, रेल्वे मागणी करत हाेते आज विमान मागतात हा बदलत्या भारताचा आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा संकेत आहे. २०४७ चा विकसित भारत संकल्प पंतप्रधान यांनी देशासमाेर ठेवला असून यात विमान क्षेत्राचा वाटा माेठा असणार आहे. ४०० विमानतळे विकसित करण्याचा संकल्प आहे. पुणे विमानतळ मध्ये माेठा बदल झाला आहे. पुण्यात दरराेज २०० विमाने ये-जा करत आहे. ५२ हजार चाैरस मीटर नवीन टर्मनिल झाले असून दरवर्षी ९० लाख लाेक या विमानतळावरुन प्रवास करत अाहे. ३४ चेकिंग काऊंटर निर्माण झाली. २५ डीजी यात्रा सुरु झाले आहे. जुने टर्मिनल देखील पुर्नविकास हाेणार असून १४ नवीन काऊंटर निर्माण हाेतील त्यामुळे अधिक १० ते १५ लाख प्रवासी प्रवास करु शकतील. १०.६६ टक्के प्रवासी क्षमता वाढ, ६० टक्के प्रवासी वाढ, कार्गे वाहतूक ८.४५ टक्के वाढली असल्याने अामूलाग्र बदल पुणे विमानतळावर दिसून येत अाहे. पुणे- भाेपाळ, त्रिवेंद्रम, चेन्नई, इंदाैर, डेहराडून विमानसेवा नव्याने सुरु झाली अाहे. विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणबाबत सातत्याने बैठक सुरु अाहे. २०० एकरपेक्षा अधिक जागा ताब्यात घेण्याचे सुत्र ठरले आहे. विमानतळ विस्तारीकरणसाठी राज्यशासन भूसंपादन करेल. कार्गाेसाठी प्राेत्साहन देण्यात येणार आहे.

See also  मराठा समाजाची बैठकीत सरकार व स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात नाराजीचे सूर

पुणे विमानतळ मेट्राे मार्गशी जाेडणार

खडकवासला ते खराडी हा मेट्राे मार्ग पुणे विमानतळाला जाेडण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक व चर्चा झाल्या अाहे. महा मेट्राे, मनपा यांच्याशी संबंधित विषय असून मनपा आणि मेट्राे याबाबत सीपीआर करण्यासाठी प्रयत्न करेल. पुण्यातील चार मेट्राे मार्ग निगडी ते स्वारगेट, हिंजवडी ते शिवाजीनगर, वनाज ते रामवाडी ,खडकवासला ते खराडी हे सर्व मेट्राे मार्ग विमानतळाशी मेट्राेने थेट जाेडण्याचे नियाेजन सुरु आहे. पुणे शहराची लाेकसंख्या ६० लाख तर जिल्हामिळून एक काेटीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पुढील ५० वर्षाचा विचार करता अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न राहिली असे माेहाेळ यांनी सांगितले.