९१ व्या वर्षीत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे दैदिप्यमान वाटचाल डॉ. गजानन एकबोटे कार्याध्यक्ष पी. ई. सोसायटी

0
slider_4552

” प्रोग्रेसिव्ह एज्यूकेशन सोसायटी ” चा ९१ वा वर्धापनदिन बुधवारी दि. ३० एप्रिल रोजी उत्साहात पार पडला…

पुणे :

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ची स्थापना दिवंगत गुरूवर्य श्री शंकररावजी कानिटकर आणि त्यांच्या ५ शिक्षक सहकाऱ्यांनी १९३४ मध्ये “अक्षय तृतीया” या शुभ दिवशी केली. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वाटचालीतील प्रमुख शब्द “प्रोग्रेसिव्ह” आणि “मॉडर्न”. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आधुनिक उपकरणे व आधुनिक पद्धतीचा वापर करण्याचा संकल्प त्या दिनी करण्यात आला जो अजूनही पाळला जातो.

१९३४ साली लावलेल्या या रोपट्याचा आता ९१ वर्षा नंतर एक मोठा वटवृक्ष तयार झालेलं आहे .

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी वेगवेगळ्या शैक्षणिक स्तरावर काम करत असुन आज प्रोग्रेससिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत ६२ विद्यालये तसेच महाविद्यालये आहेत. एकुण ६०,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना संस्था ज्ञानदानाचे काम करते. विविध क्षेत्रांमध्ये प्रॉग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आपले नाव मोठं करत आहे. कला , क्रीडा , शिक्षण, संशोधन, राजकारण सर्वच क्षेत्रामध्ये प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी प्रगती करत असुन या सर्वच बाबतीत आज संस्था आघाडीवर आहे.

संस्थेच्या ५ महाविद्यालयांना (नॅककडुन ) ‘A, A+,.A++ ‘नामांकन मिळाले आहे. संस्था विद्यापीठाकडे वाटचाल करत आहे. पुढील ५ वर्षात ७५% महाविद्यालयांचे नामांकन करुन संस्था एक “माॅडर्न विद्यापीठ” उभे करण्याच्या तयारीत आहे.

संस्थेच्या अंतर्गत काम करणाऱ्या संस्था शैक्षणिक क्षेत्रात अतिशय मोलाची कामगिरी करत आहेत. सामाजिक कार्यात देखील संस्था अग्रेसर आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात आघाडीवर असुन समाजाच्या सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.

संस्थेचे कार्याध्यक्ष मा डाॅ गजानन र एकबोटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही एक आघाडीची शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. सर्व स्तरातील विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत.

स्नेहमेळाव्याच्य निमित्ताने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी चे सर्व संबंधीत तसेच सर्व विद्यालय महाविद्यायाचे प्राचार्य तसेच शिक्षक व संस्थेचे अध्यक्ष , कार्याध्यक्ष , कार्यवाह , सहकार्यवाह उपस्थित होते .

See also  बाणेर बालेवाडी मधील पाणीटंचाईच्या संदर्भात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन..

संस्थेचे माननीय :

पी. ई. सोसायटीचे आध्यक्ष श्री विघ्नहारी देवमहाराज, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अरविंद पांडे , संस्थेचे कार्याध्यक्ष, डॉ. गजानन एकबोटे, संस्थेचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, सहकार्यवाह प्रा. सुरेश तोडकर, उपकार्यवाह चित्तरंजन कांबळे, उपकार्यवाह डॉ. प्रकाश दीक्षित, उपकार्यवाह डॉ. निवेदिता एकबोटे, उपकार्यवाह दीपक मराठे, नियामक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी

सन्माननीय उपस्थिती :

नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरली मोहोळ, आमदार अमित गोरखे, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी,  आमदार  हेमंत रासने,  माधुरीताई सहस्त्रबुध्दे, आमदार जगदीश मुळिक, डाॅ प्रकाश करमळकर, कुलगुरू, आर्यव्रत ईंटरनॅशनल विद्यापीठ, त्रिपुरा, नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्रा. पंडित विद्यासागर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: प्र. कुलगुरू डाॅ. पराग काळकर, रजिस्टार डॉ. ज्योती भाकरे, परीक्षा विभाग प्रमुख डाॅ. प्रभाकर देसाई, विद्यापीठ अनुदान अयोगाचे माजी उपाध्यक्ष डाॅ. भूषण पटवर्धन, वृत्तपत्र विभाग प्रमुख  संजय तांबट, डाॅ. प्रफुल्ल पवार, डाॅ प्रसन्नजित फडणविस, श्री रवींद्र रंजनवाडकर, मा भाऊसाहेब जाधव, राजेश नायर,जगदीश कुलकर्णी, डाॅ. सुदाम शेळके, डाॅ. उमेद बिबवे, सौ पारखी, डाॅ. श्रीकांत पाटील, माधव भंडारी, डाॅ. दत्तात्रय जाधव डॉ. राजेंद्र भामरे ,  विजय पुरंदरे डाॅ. सतिश डुंबरे,  रवींद्र शिंगणापुरकर,  सुनिल महाजन, रौनक जयाशेट्टी, सामाजिक कार्यकर्त्या . शामला देसाई,

सिमबायसिसचे प्राचार्य डाॅ. सोमण, डाॅ. धनंजय लोखंडे, डॉ. अडसूळ, डॉ. अशोक कांबळे, डॉ. अबाळे, बापू मानकर, वेदमूर्ती नाना मुळे, डाॅ गोलार, डायरेक्टर, ईनोव्हेश अॅड ईनव्हेंशन सेंटर, आमदार जगदीश मुळीक. प्रा दिपक माने,  शिरीष कुलकर्णी,  सुधीर आव्हाड,  रवींद्र साळेगावकर,  प्रमोद वलगडेकर, बापू मानकर,  सुनिल पांडे व एस के जैन हे उपस्थित होते.

या शिवाय विविध वृत्तपत्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या.