औंध :
औंध रोड येथील स्पायसर कॉलेज जवळील, महाराष्ट्र हॉटेल समोरील चार वृक्षांची प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता अज्ञात इसमांकडून तोड करण्यात आली आहे. या तोडण्यात आलेल्या झाडांमध्ये तीन बदामाची व एक उंबराचे झाड खोडापासून तोडण्यात आले आहे.
या बाबत स्थानिक नागरिकांनी व जवळील शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सदर बाब मनसे स्थानिक शाखा अध्यक्ष मयूर बोलाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्या बाबत मनसे व तक्रारदार नागरिकांकडून संबंधित वृक्ष प्राधिकरण खात्याचे वृक्ष निरीक्षक अनिल साबळे यांना सदर घटनेबाबत विचारपूस केली गेली. त्याबाबत साबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला, व सदर वृक्ष छाटणी बाबंत त्यांच्या खात्याकडून कोणतीही परवानगी दिली गेली नाही असे उपस्थित नागरिक व मनसे पदाधिकारी व पोलिस खात्यातील अधिकारी यांना त्यांनी संगतीले.
ह्या वेळी ज्या अज्ञात व्यक्तींकडून सदर वृक्षांची छाटणी व तोड करण्यात आली त्यांच्या विरोधात लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा मनसे स्टाईल खळ खट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी उपविभाग अध्यक्ष निलेश जुनवणे यांनी सांगितले की, परिसरात वारंवार अशाप्रकारे अनाधिकृत रित्या वृक्षतोड केली जाते. यावर प्रशासनाने ठोस कारवाई करावी तसेच या ठिकाणी होल्डिंग उभारण्यासाठी वृक्षतोड केली असल्याचे लक्षात येत आहे. अशा वृक्षतोड करून उभारण्यात येणारे होल्डिंगला प्रशासनाने परवानगी देऊ नये.
यावेळी विभाग अध्यक्ष विनायक कोतकर, उपविभाग अध्यक्ष निलेश जूनवणे, सुनिल लोयरे, पिंपरी चिंचवड उपशहर अध्यक्ष राजू सावळे, स्थानिक शाखा अध्यक्ष मयूर बोलाडे,जितेंद्र कांबळे,अमर अढाळगे,जनाताई रणदिवे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.