पाषाण :
पाषाण सुस रोड येथील बालाजी चौक, साई चौक, शिवशक्ती चौक, हायवे ब्रिजवरील क्रॉसिंग येथील समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत येथील नागरिकांनी पाहणी केली.
या ठिकाणच्या वाहतूक समस्येचा व अर्धवट फुटपाथ चा कामाचा आढावा पुणे मनपाचे अधिकारी व वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी यांच्या समवेत घेण्यात आला. बालाजी चौक येथील बालाजी मंदिर रोडवर येणाऱ्या वाहतुकीसाठी सिग्नल मर्यादा वाढवण्यासंदर्भात, चौकातील गोल सर्कल शिफ्ट करण्यासंदर्भात सकारात्मक विचार झाला. सुस रोडवरील पार्किंग संदर्भात वाहतूक विभागाने त्वरित परीक्षण करून निर्णय घ्यावा, सिग्नल व्यवस्था अधिक सक्षमपणे कशी कार्यान्वित करता येईल यासंबंधी चर्चा झाली.
सुस रोडवरील स्पीड बेकर कसे हटवता येतील या संदर्भात पाहणी करण्याचा निर्णय झाला. हायवे ब्रिज जवळील सर्विस रोड त्वरित वाहतुकीसाठी खुले करण्यात यावे व नागरिकांची गैरसोय टाळावी अशाही सूचना त्यांना देण्यात आल्या. शिवाय पादचार्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी दोन चौकांच्या मध्ये पादचारी क्रॉसिंग ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला.
या सर्व कामांची त्वरित पाहणी करून रोडवरील उर्वरित विकासात्मक कार्य त्वरित पूर्ण करण्यात यावे, शिवाय वाहतूक व्यवस्था लवकरात लवकर सुरळीत करण्यात यावी अशाही सूचना नागरिकांच्या वतीने देण्यात आल्या यावेळी पुणे मनपाचे पथविभागाचे अधीक्षक अभियंता दिनकर गोजारे, तसेच औध परिमंडळाचे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी, भाजपचे उपाध्यक्ष राहुल कोकाटे, अशोक दळवी व मनपाचे इतर कर्मचारी व वाहतूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.