विनापरवाना कीर्तनाचा कार्यक्रम घेतल्या प्रकरणी शिवसेना उबाठा पक्षाच्या शहराध्याक्षांवर गुन्हा

0
slider_4552

वाकड :

कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी घेतली नाही, याप्रकरणी शिवसेना उबाठा पक्षाचे शहराध्यक्ष आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड ते डांगे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगलनगर समोर थेरगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

न्यू आझाद युवक संघ, ॲड. सचिनभाऊ भोसले युवा मंचचे अध्यक्ष ॲड. सचिन भोसले व मंडळाचे पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सचिन सुतार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू आझाद युवक संघ, ॲड. सचिनभाऊ भोसले युवा मंचच्या वतीने वाकड येथून डांगे चौकाकडे जाणाऱ्या रोडवर मंगलनगर समोर थेरगाव येथे हभप सुप्रिया साठे ठाकूर (ठाकूर पिंपरी चाकण) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्यात आली. दरम्यान यामुळे रस्ता बंद करून लोकांना जाण्या-येण्यास अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

See also  भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर