गुरुवारी पुण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद

0
slider_4552

पुणे :

येत्या गुरुवारी (26 ऑक्टोबर) वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत एसएनडीटी आणि चतु:श्रृंगी, तळजाई, लष्कर जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (27 ऑक्टोबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

*या परिसरात असेल पाणीपुरवठा बंद*

वारजे जलशुद्धीकरण केंद्र, चतुःशृंगी टाकी, पुणे कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्र येथे देखभाल दुरुस्तीची कामे होणार आहेत. त्यामुळे तळजाई विभागातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कोथरूड, कर्वेनगर, वारजे, शिवणे, भुसारी कॉलनी, शिवतीर्थनगर, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी, डेक्कन, पुलाची वाडी, शिवाजीनगरचा परिसर, औंध, बाणेर, नगर रस्ता, खराडी गावठाण, चंदननगर, हडपसर, मुंढवा, महंमदवाडी, ससाणेनगर, काळेपडळ, येरवडा, बिबवेवाडी, बालाजीनगर, इंदिरानगर, तळजाई परिसर, कात्रजचा काही भाग आदींचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.

See also  पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या विविध प्रकल्पांच्या निषेधार्थ पुण्यातील पर्यावरण संस्थांनी 'परिवर्तन दूत' पुरस्कार केले परत.RFD वृक्षतोडीच्या विरोधात 'चलो चिपको' आंदोलनाची घोषणा करत 'जनसुनावणी'