औंध :
ॲड. डॉ. मधुकर मुसळे यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश प्रवक्तेपदी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती केली आहे.







ॲड. डॉ. मधुकर मुसळे उच्च विद्या विभूषित असून केली 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे निष्ठेने कार्य करीत आहेत. यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टी औंध अध्यक्ष, पुणे शहर चिटणीस व शहर उपाध्यक्ष तसेच राज्य विधी सेलचे सहसंयोजक म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. तसेच औंध भागातील विविध विकास कामांमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
मला प्रदेश अध्यक्षांनी दिलेल्या जबाबदारी व माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. पक्षाचे ध्येय, धोरण, भूमिका व विकास कामे हे प्रचार व प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा पूर्ण क्षमतेसह प्रामाणिकपणे प्रयत्न मी करणार आहे, असे ॲड. डॉ. मधुकर मुसळे यांनी सांगितले.








