पुणे :
पादचारी दिन (वॉकिंग प्लाझा) निमित्त सोमवारी (दि.11) लक्ष्मी रोडव रून संचलनात असणाऱ्या बसेसच्या मार्गांत बदल करण्यात आला आहे. लक्ष्मी रोडवर (उंबऱ्या गणपती चौक ते गरूड गणपती चौक) संचलनात असलेल्या बसेसच्या मार्गात सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत बदल राहणार आहे.
*हे बदल पुढील प्रमाणे –*
1) बस मार्ग क्र. अटल पुण्यदशम 7 व 9 हे मार्ग बंद राहतील.
2) बस मार्ग क्र. 55, 58, 59 हे बस मार्ग शनिपार कडे येताना कुमठेकर रोड मार्गे नियमित मार्गाने व शनिपार कडून जाताना अ.ब.चौक, नारायण पेठ, अलका टॉकीज चौकातून पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.
3) बस मार्ग क्र. 57 या मार्गावरील बसेस पुणे स्टेशनकडुन जाताना बस मार्ग क्रं 94 ने नारायणपेठ मार्गे अलका टॉकिज चौक व पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.
4) बसमार्ग क्र. 81, 144, 144 अ, 144 क व 283 या मार्गावरील बसेस पुणे स्टेशनकडे जाताना नियमित मार्गाने व पुणे स्टेशन कडून येताना मनपा मार्गे संचलनात राहतील.
5) बसमार्ग क्र. 174 या मार्गावरील बसेस पुणे स्टेशनकडून एनडीए कडे जाताना सिटी पोस्ट पर्यंत नियमित मार्गाने व पुढे सिटी पोस्ट चौकातुन डावीकडे वळुन स्वारगेट, सारसबाग, टिळक रोड, डेक्कन कॉर्नर व पुढे नियमित मार्गाने एनडीए कडून पुणे स्टेशनकडे येताना सदर मार्गावरील बसेस नियमित मार्गाने संचलनात राहतील.
6) बस मार्ग क्र. 197 व 202 या मार्गावरील बसेस हडपसर कडून कोथरूड डेपो /वारजे माळवाडीकडे जाताना सिटी पोस्ट पर्यंत नियमित मार्गाने व पुढे सिटी पोस्ट चौकातून डावीकडे वळुन स्वारगेट, सारसबाग, टिळकरोड, डेक्कन कॉर्नर व पुढे नियमित मार्गाने कोथरूड डेपो वारजे माळवाडी कडून हडपसर कडे येताना सदर मार्गावरील बसेस नियमित मार्गाने संचलनात राहतील.
बसमार्ग क्र. 68 या मार्गावरील बसेस अप्पर डेपो कडे जाताना नियमित मार्गाने व अप्पर डेपो कडून सुतारदरा कडे येताना टिळकरोड मार्गे संचलनात राहतील. सदर दिवशी वॉकिंग प्लाझा संपलेनंतर वरील सर्व मार्गावरील बसेस पुर्ववत मार्गाने संचलनात राहतील.
तसेच या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरीकांच्या सोयीसाठी नगरकर तालीम चौक ( नु.म.वि. चौक)- बाजीराव रोड- मनपा- नगरकर तालीम चौक ( नु.म.वि. चौक) या मार्गावर 30 मि. वारंवारीतेने, स्वारगेट – उंबऱ्या गणपती चौक – स्वारगेट या मार्गावर 40 मी. वारंवारीते ने व डेक्कन – उंबऱ्या गणपती चौक – डेक्कन या मार्गावर 30 मी. वारंवारीतेने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच शिवाजीनगर सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन येथून येणाऱ्या नागरीकांच्या सोयीसाठी बसमार्ग क्र.2 शिवाजीनगर रेल्वे स्टेशन ते स्वारगेट या मार्गावरील बसेस सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन मार्गे ४ मि. वारंवारीतेने संचलनात ठेवण्यात येणार आहेत.
तरी या बसेसचा व कार्यक्रमाचा नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.