विकसित भारत रथ यात्रेचे औंध येथे सचिन मानवतकर यांनी केले स्वागत.. नागरिकांनी केल्या विविध योजनेत नाव नोंदणी.‌‍‌

0
slider_4552

औंध :

प्रधानमंत्री आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणेने विकसित भारताचा संकल्प घेऊन मार्गस्थ झालेल्या विकसित भारत रथ यात्रेचे आज औंध येथील जगदीश नगर , इंदिरा वसाहत येथे छत्रपति शिवाजी महाराज नगर चे आमदार सिद्धार्थ  शिरोळे यांच्या मार्गदर्शना खाली सचिन मानवतकर सदस्य भाजपा यांनी स्वागत केले.

याअंतर्गत विविध लोकाभिमुख योजनांचे स्टॉल्स उभारून येणाऱ्या नागरिकांची योजनांसाठी नावनोंदणी करण्यात आली. यावेळी डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून विविध योजनांच्या माहितीची व या योजनांमुळे जनतेच्या जीवनात होत असलेल्या परिवर्तनाची माहिती सांगणारी चित्रफीत सादर करण्यात आली. विकसित भारताच्या या प्रवासाचे आपण सहप्रवासी होत आहोत याचा आनंद सर्व नागरिकांच्या चेहऱ्यावर जाणवला. या यात्रे च्या निमित्त कस्तूरबा वसाहत व इंदिरा वसाहत येथील गरजु नागरीकांचे शासकीय कामे मार्गी देखील लागली. काही पात्र महिलांना प्रधानमंत्री ऊज्वला गॅस योजनेत मोफत गॅस देखील देन्यात आला.

या कार्यक्रमा साठी माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, माजी नगरसेवक सनी निम्हण, अपर्णा कुऱ्हाडे, संयोजक अजय दुधाने, सागर मदने उपस्थित होते. या यात्रे च नियोजन सचिन मानवतकर मित्र परिवार यांनी केले.

See also  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अद्ययावत क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करणार : अजित पवार