कोंढवा :
ऋतुजा भोईटे-रिक्षा चालकाच्या मुलीला मिळाली 2 कोटींची स्काॅलरशिप. ऋतुजा भोईटे कोंढवा खुर्द पुणे येथे राहणारी हिचे वडील रिक्षा चालक असून अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने तीने हे यश खेचून आणले.







कोंढवा ते अमेरिका हा तिचा प्रवास थक्क करणारा आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण कोंढवा येथे पुणे महानगरपालिकेच्या शाळेत झाले असून पुढे तिला १० वी साठी UWC पौंड येथे प्रवेश मिळाला तेव्हा तिला ५० लाखाची UWC थायलंडची स्काॅलरशिप मिळाली होती.
अमेरिकेत तिला Lake Forest या विद्यापीठाची २ कोटीची स्कॉलरशिप मिळाली असून ती लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे.
ऋतुजाचे वडील अरूण भोईटे रिक्षा चालक असून आई नंदा भोईटे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. ऋतुजाला अजून २ बहिणी आणि १ भाऊ असा परिवार आहे. तिचे मामा संतोष खोडवे चिंचवड येथे राहत असून त्यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.







