बाणेर येथे अतिक्रमण कारवाई 30000 चौ.फूट क्षेत्र रिकामे करण्यात आले…

0
slider_4552

बाणेर :

औंध – बाणेर लिंक रोड रस्त्यालगत अनधिकृत शेड व दुकाने व हॉटेल पंजाब दा धाबा यावर बांधकाम विकास विभाग झोन 3, क्षेत्रिय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी व स्थानिक पोलीस स्टाफच्या मदतीने कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमधे सुमारे 30000 चौ.फूट क्षेत्र रिकामे करण्यात आले आहे.

सदर कारवाई पुणे महानगरपालिकेचे उप अभियंता निवृत्ती उतळे, कनिष्ठ अभियंता अजित सणस, संदीप चाबुकस्वार, टूलीप इंजिनियर सुदर्शन मस्के, रोहीत बरकले क्षेत्रिय कार्यालय चे अतिक्रमण निरिक्षक सचिन उतले, वैभव जाधव, किरण नवले यांचे पथकाने कारवाई केली.

कारवाई बांधकाम व्यवसायिकाच्या मदतीसाठी…

कारवाई बांधकाम व्यवसायिकांच्या मदतीसाठी केली असल्याचा आरोप यावेळी येथील नागरिकांनी केला. महापालिका कर्मचारी व पोलीस कर्मचारी अतिक्रमण कारवाई केल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी बांधकाम व्यवसायिकांनी जागेवर ताबा मारण्यास सुरुवात केल्याने नागरिकांनी विरोध केला. कारवाई दरम्यान गोंधळ निर्माण झाला. यामुळे कारवाई नेमकी अतिक्रमण विभागाची की बांधकाम व्यवसायिकाची असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला.

 

See also  बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपणाचे आयोजन : संतोष तोंडे