औंध :
इंदिरा-कस्तुरबा संविधान अभ्यास गटाच्यावतीने आज इंदिरा नगर येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.







साथी निश्चल, साथी श्रीकृष्ण यांनी सध्या देशासमोर उभे राहत असलेले प्रश्न, त्यातून संविधानाला निर्माण झालेला धोका याबाबत मांडणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, दत्ताभाऊ रणदिवे, काका गरबडे, रामधन गायकवाड, शंकर भोसले, कुसुमताई साखळे, प्रफुल्ल सोनावणे रामधन गायकवाड, अक्षय खवळे आदी उपस्थित होते.
संविधान दौड
पहाटे साडे पाच वाजता पुणे महापालिकेतील महात्मा फुले पुतळा ते इंदिरा वसाहत अशी संविधान दौड काढण्यात आली. यामध्ये हातात तिरंगा घेऊन दत्ताभाऊ रणदिवे व प्रविण साबळे यांनी सहभाग घेतला.








