पवना धरणात बुडून मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

0
slider_4552

पवना :

पवना धरण परिसरातील ठाकूरसई येथे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा धरणात बुडून मृत्यू झाला. तर त्याच्या सहका-याला वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले. ही घटना शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.

आदित्य सचिन बुंदिले (वय 20, रा. नागपूर) असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर मनीष शंकर शर्मा (वय 20, रा. मुंबई) याचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर मधील लोणी प्रवरा येथील बाळासाहेब विखे पाटील मेडिकल कॉलेजचे 15 विद्यार्थी प्रजासत्ताक दिनानिमित्त पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते.

हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र मनीष शर्मा याला वाचविण्यात ग्रामस्थांना अपयश आले. आदित्य बुंदेले या विद्यार्थ्याला ग्रामस्थांनी पाण्यातून सुखरूप बाहेर काढले आहे.

See also  पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता