मॅक न्यूज :
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे मनोज जरांगे पाटील गेल्या पाच दिवसापासून विविध मागण्यासाठी उपोषणाला बसले आहे.
जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केल्यापासून त्यांच्या भेटीसाठी राज्यातील सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील आमदार- खासदारांनी त्यांची भेट घेत त्यांना पाठींबा दिला होता. पण आजपर्यंत राज्य सरकारचा कोणताही प्रतिनिधी त्यांच्या भेटीला आलेला नव्हता. मात्र, आज सरकारचे प्रतिनिधी म्हणून कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भेट घेतली.
यावेळी सरकारने जरांगे पाटील याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला होता, केला आहे. तो त्यांनी मान्य केला आहे .
*या भेटीत नेमकं काय घडलं?*
या भेटीमध्ये सरकारने मराठा आरक्षणाच्यासंबंधी जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एका महिन्याचा वेळ मागितला. मात्र, जरांगे पाटील यांनी आधी सरकारला जे काही कारायचे आहे ते 30 जूनच्या आधी करावे, असे म्हटले होते. मात्र, शंभुराजे देसाईंनी समजूत काढल्यानंतर जरांगे पाटील सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यास तयार झाले.
यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला इशाराही दिला आहे. ते म्हणाले जर एक महिन्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भातील मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत उतरू.
दरम्यान सरकारला, जरांगे पाटील यांनी आरक्षणासंबंधी मागण्या पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. त्याचबरोब त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.