विधानसभा निवडणुकीची तयारी, मतदान केंद्र स्तरीय प्रतिनिर्धींची नेमणुकीचे आवाहन

0
slider_4552

पुणे :

मतदार यादी शुद्धीकरणासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यासमवेत (बीएलओ) राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीने (बीएलए) गृहभेटी, मतदार नोंदणीच्या अनुषंगाने विशेष मोहीम, ऑनलाईन मतदार नोंदणीत मतदारांना सहाय्य करणे अपेक्षित असून त्यासाठी पक्षांनी बीएलएंची नेमणूक करावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिर्धींसमवेत आयोजित बैठकीत कळसकर आणि निवडणूक शाखेचे तहसीलदार राहुल सारंग यांनी संवाद साधला. कळसकर म्हणाल्या, मतदान केंद्र निश्चितीसाठी शक्यतो एका बूथमध्ये 1 हजार 450 मतदारांचा समावेश असेल अशी स्वयंचलीत प्रणाली उपयोगात आणली जात आहे. शहरात सध्या 15 पेक्षा अधिक बूथ असलेली 40 ते 45 मतदान केंद्रे असून त्यांची सुसूत्रीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच आपल्या घराजवळ असलेल्या मतदान केंद्राऐवजी लांब जावे लागलेल्या मतदारांना सोईचे होईल असे मतदान केंद्रांचे रैशनलायझेशन करण्याच्यादृष्टीने प्रयत्न असल्याचे कळसकर यांनी सांगितले.

मतदार नोंदणीचे काम निरंतर सुरू असते. तथापि, विशेष पुनरीक्षण मोहिमेत प्राप्त होणारे सर्व अर्ज विहित कालमयदित निकाली काढून अंतिम मतदार यादी पुढील निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्याचे काम होत असते. त्यादृष्टीने आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे.

छायाचित्र यादीतील श्वेतथवल फोटो, अस्पष्ट फोटो असलेल्या मतदारांकडुन रंगीत फोटो घेण्याची प्रक्रिया करण्यात येते. तसेच पत्ता बदल, स्थलांतरण तसेच दावे व हरकर्तींच्या अनुषंगाने संबंधित मतदारांना नोटीस देऊन कार्यवाही केली जाते. मतदारांनी शक्यतो

आयोगाच्या https://yoters.eci.goyin या पोर्टलवरून अथवा Voter Helpline वरुन मतदार नोंदणी, पत्ताबदल आदींचे अर्ज 6, अर्ज 7 तसेच 8 भरल्यास संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याना त्यावर गतीने कार्यवाही करता येते. मतदार यादीतील नाव वगळणुकीची यादी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.goy.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येते, असेही कळसकर म्हणाल्या. यावेळी विशेष पुनरीक्षकण कार्यक्रम- 2024 ची माहिती देण्यात आली. बैठकीत मतदार यादीतील नाव असणे- नसण्याच्या अनुषंगाने समस्या, तपशीलात बदल, मतदान केंद्रात, मतदान खोलीत बदल, अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

See also  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदावर किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती