गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालय करणार नॅक मूल्यांकनासाठी मार्गदर्शन

0
slider_4552

पुणे :

गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयाने पुण्यातील पाच महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नुकताच सामंजस्य करार केला. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्यातील नॅक मूल्यांकन न झालेल्या संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी परिस-स्पर्श योजनेची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त उच्च शिक्षण संस्थानी नॅक मूल्यांकन प्राप्त करावे आणि त्याद्वारे गुणवत्ता सुधार करावा हा या योजनेचा उद्देश आहे.

सावित्रीबाई फुले विद्यापीठाद्वारे राज्य सरकारच्या या योजनेसाठी मार्गदर्शक संस्था म्हणून मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंडची निवड करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय गुलटेकडी, प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न महाविद्यालय वारजे, धारेश्वर शिक्षणशास्र महाविद्यालय धायरी, शांताबाई शिवराम पवार महाविद्यालय अंबेगाव, स्वराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धनकवडी या पाच महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या पाच महाविद्यालयातील प्राचार्य, आय.क्यू.ए.सी. समन्वयक व सदस्यांसाठी नॅक मूल्यांकन प्रक्रिये संबंधी एकदिवसीय जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी उपस्थितांना मूल्यांकन प्रक्रियेतील विविध टप्प्यांविषयी माहिती दिली आणि मार्गदर्शन केले. उपस्थित महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकनाची तयारी कोणत्या टप्प्यात आहे याविषयी माहिती दिली.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. सोपान कांगणे, प्राचार्य डॉ. वर्षा बापट, प्राचार्य डॉ. शोभा कांबळे, प्राचार्य डॉ. शाकेरा इनामदार आणि प्राचार्य डॉ. भरत जिंतुरकर तसेच पाचही महाविद्यालयांतील आय.क्यू.ए.सी. चे समन्वयक व सदस्य यांनी मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड बरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. कार्यशाळेचे आयोजन व सूत्रसंचालन प्रा. पराग शाह यांनी केले. महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष प्रा. सुरेश तोडकर व व्हिजीटर डॉ. प्रकाश दीक्षित यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. ज्योती गगनग्रास, डॉ. शुभांगी जोशी व प्रा. स्वाती कंधारकर उपस्थित होते. आभार प्रदर्शन डॉ. विनय कुमार यांनी केले.

See also  शिवसेना पुणे शहराच्यावतीने काश्मीर पंडितावर झालेल्या हल्ल्याचा जाहिर निषेध