पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी भागातील भाजप कार्यकारिणी जाहीर

0
slider_4552

पाषाण :

भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 9 पाषाण, सुतारवाडी,सोमेश्वरवाडी कार्यकारिणी पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, आमदार जगदीशजी मुळीक याच्या उपस्थित व पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे माजी उपाध्यक्ष राहुल कोकाटे याच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.

नवनाथ ववले याची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर सत्यजित पाठक व प्रदिप खोंड याची सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली, राजेंद्र कोकाटे व शरद पाषाणकर याची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर युवा मोर्चा अध्यक्ष पदी शिरीष कोकाटे याची निवड करण्यात आली. 

संघटनात्मक काम व आगामी महानगरपालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवून कार्य करीत रहावे, नागरीसमस्या निराकरण करण्यास प्राधान्य देण्यात यावे असे शहराध्यक्ष मुळीक यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत पाषाण परीसरात कमळ फुलविण्यात कार्यकर्त्यांना नक्कीच यश येईल असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष नवनाथ ववले यांनी व्यक्त केला.

कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, स्वि.नगरसेवक सचिन पाषाणकर, प्रकाश बालवडकर,महिला आघाडी अध्यक्षा हर्षदा फरांदे, युवामोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहळ, नितीन कोकाटे, रत्नाकर मानकर, उत्तम जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
रोहन कोकाटे,विराज कोकाटे,आकाश पवार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

See also  शिवसेना विभाग प्रमुख संतोष तोंडे यांच्यावतीने रिक्षाचालकांसाठी अन्य धान्य किट वाटप