पाषाण :
सचिन दळवी सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित मंत्री चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेचा अंतिम दिवस आणि मेगा फाइनल सामना उत्साहात पार पडला. या क्रिकेट स्पर्धेच्या समारोप व पारितोषिक वितरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थिती पार पडला. विजयी संघांना त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच या वेळी पंचक्रोशीतील माजी खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी आयोजकांचे कौतुक केले. सचिन दळवी यांनी विविध उपक्रमातून नेहमीच नागरिकांची सेवा केली आहे. या वेळी एवढ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे हे कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस राघवेंद्र बाप्पू मानकर, सचिन पाषाणकर , प्रमोद निम्हण, लहू बालवडकर, रोहन कोकाटे, राहुल कोकाटे मोरेश्वर बालवडकर, अनिकेत चांदेरे, प्रमोद कांबळे , विवेक मेहता ,सचिन सुतार ,सुशील सरकटे ,आनंद जराड, वंदना सिंह, सुरेखा वाबळे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल…
महिला हाफ पिच क्रिकेट स्पर्धा – विजेता संघ
परफेक्ट १० स्ट्रायकर्स संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाने ३१,००० रुपये व ट्रॉफी जिंकली. यश्विन आनंद संघाने द्वितीय क्रमांक मिळवत २१,००० रुपये व ट्रॉफी जिंकली.
भव्य फुल पिच क्रिकेट स्पर्धा (पुरुष गट) – जे फाइव्ह इलेव्हन कोंढवा क्रिकेट संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि १,११,१११ रुपये व भव्य ट्रॉफी जिंकली.
• द्वितीय क्रमांक : न्यू गोल्डन सीसी बावधान क्रिकेट संघ (७१,००० रुपये व ट्रॉफी)
• तृतीय क्रमांक : डीके पँंथर वाघोली क्रिकेट संघ (५१,००० रुपये व ट्रॉफी)
• चतुर्थ क्रमांक : सोमेश्वर स्पोर्ट्स क्लब (३१,००० रुपये व ट्रॉफी)
या स्पर्धेमुळे परिसरातील क्रिकेटपटूंना संधी मिळाली असून, त्यांच्यातील गुणांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. यापुढेही अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करून नवोदित खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली जाईल, असे आयोजक सचिन दळवी यांनी सांगितले.