बाणेर येथे धूळखात पडलेल्या महिला जिम इमारतीची वसुंधरा अभियानाच्या वतीने करण्यात आली स्वच्छता.

0
slider_4552

पाषाण:

बाणेर येथील सर्वे नंबर 13 मधील कै. सगुणाबाई ज्ञानेश्वर मुरकुटे महिला जिम पुणे महानगर पालिकेच्या वतीने अमेनिटी स्पेसच्या जागेत कोट्यावधी रुपये खर्च करून दोन मजली महिला जीमची इमारत उभारण्यात आली आहे. या जिमच्या आवारामध्ये दारू पिणाऱ्यांच्या संख्येमुळे हा परिसर मद्यपींचा अड्डा झाला होता.

वसुंधरा अभियान मार्फत कार्यकर्त्यांनी जागरूकता दाखवित पालिकेच्या महिला जीमच्या आवारामध्ये सापडलेला दारूच्या बाटल्यांचा खच व परिसरात वाढलेली झाडी व अस्वच्छ परिसर स्वच्छ केला.

नागरिकांच्या पैशातून उभारण्यात आलेली ही इमारत वापरात यावी या हेतूने वसुंधरा अभियान व माऊली फाऊंडेशनच्या वतीने या परिसरातील घाण कचरा व दारूच्या बाटल्या काढून हा परिसर स्वच्छता करण्यात आला. नागरिकांच्या हिताच्या उपक्रमांसाठी ही इमारत वापरात आणावी तसेच या परिसरातील महिला जिम व योगा हॉल वापरात आणावा अशी मागणी यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. महापालिका प्रशासनाचे या बांधल्या गेलेल्या सार्वजनिक वास्तू स्वयंसेवी संस्थांना चालवायला दिल्यास अशी बिकट परिस्थिती निर्माण होणार नाही.

वसुंधरा अभियान मार्फत नेहमीच सामाजिक हित जोपासले गेले आहे. महिला जिम व योगा हॉल वापरात आणण्याच्या दृष्टीने त्वरित प्रयत्न होणे गरजेचे आहे. अन्यथा सदर जागेची दुरवस्था होवून कोट्यवधी रुपयांचा खर्च कचऱ्यात जाण्याची भिती वसुंधरा अभियानाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. बाणेर बालेवाडी परीसरात नागरीकांच्या साठी मोठ्या प्रमाणात खर्च करून अशा विविध सार्वजनिक वास्तू उभारल्या आहेत. परंतू केवळ निधि खर्च करून त्या धूळ खात पडल्या आहे. निदान यापुढे तरी प्रशासन योग्य दखल घेवून परत अशी दुरवस्था होवू नये याची काळजी घेईल अशी अपेक्षा वसुंधरा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

See also  सोमेश्वर स्पोर्ट्स क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेचा 'सोमेश्वर चषक' आर.डी.एक्स संघाने पटकावला.