औंध :
श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंध तर्फे श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन दिनांक १९ मार्च २०२५ रोजी औंध येथे होणार आहे. हे पालखीच्या आगमनाचे पंचविसावे वर्ष आहे. त्या निमित्ताने १३ मार्च ते २० मार्च या काळात समाज परिवर्तनाच्या उद्देशाने भक्ती भावाचे दर्शन घडवणारे पंचवीस कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
संस्थापक अध्यक्ष अँड.श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शना खाली प्रतिष्ठान तर्फे या कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. या उत्सवाच्या निमित्ताने भक्तासाठी भजन कीर्तन, समाज स्वास्थ्यासाठी योग प्रामायाम शिबीर, सर्वासाठी वैद्यकीय तपासणी आयोजित केली आहे. वातावरण शुद्धतेसाठी अग्निहोत्र, ज्ञानवर्धनासाठी परिसंवाद कार्यक्रम ठेवला आहे. विद्यार्थ्यांमधील कलामूल्य जोपासण्यासाठी नृत्य, पाठांतर बक्षीससमारंभ आयोजित केला आहे. समाजातील मान्यवरांना त्यांच्या सर्वोत्कृष्ठ कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम आहे.
मंगळवारी आठरा मार्च रोजी, आदरणीय प. पु. जगद्गुरु शंकराचार्य विद्या नरसिह भरती, करवीर पीठ कोल्हापूर यांच्या हस्ते या वर्षीचा स्वामी समर्थ औंध पुरस्कार ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरु सुरेश गोसावी, सिने दिग्दर्शक प्रवीण तरडे, सिने अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांची प्रमुख उपस्थिती आहे.
रविवारी सोळा मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता डॉ पुरुषोत्तम राजीमवाले, शिवपुरी अक्कलकोट यांच्या उपस्थितीमध्ये सार्वजनिक अग्निहोत्र कार्यक्रम आहे. श्री स्वामीसमर्थ अन्नछत्र अक्कलकोट पादुकांचे आगमन आणि मिरवणूक बुधवारी एकोणीस मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता होईल.
औंध गावाचे समस्त गावकरी, औंध गाव विश्वस्त मंडळ, औंध गाव भजनीमंडळ, यांच्या सह अंकुश चोंधे, अँड. तानाजी चोंधे, संग्राम मुरकुटे, दीपक कलापुरे, विनायक चोंधे, स्वामीसमर्थ प्रतिष्ठानचे विश्वस्थ, आणि समस्त स्वामी भक्त या सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन झाले.