बालेवाडी विमेन्स क्लब यशस्वी दशकपूर्ती…

0
slider_4552

बालेवाडी :

बालेवाडी विमेन क्लब च्या दशक पूर्ती निमित्त विविध कार्यक्रमाचे जल्लोषात आयोजन. महिला सबलिकरण हा हेतू ठेवून बालेवाडी विमेन क्लब च्या दशक पूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित झाले.

“प्रयास “संस्थेच्या मदतीने सर्व्हिकल कॅन्सर चि मोफत चाचणी आणि त्यावर विनामूल्य उपचार असा स्तुत्य उपक्रम पार पडला ज्याला बालेवाडी परिसरातील महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला.

आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपले अस्तित्व सिद्ध करताना दिसतात पण व्यस्त दिनचर्येंतून थोडासा वेळ आपल्या शारीरिक तंदुरुस्ती साठी देखील काढला पाहिजे आणि म्हणून गेली दहा वर्षे महिलांसाठी खास क्रिकेट प्रीमिअर लीग चे आयोजन करण्यात येते आहे, बेलन से लेकर बॅट तक अशा ह्या पर्वणीसाठी महिला वर्षभर तयारी करतात आणि त्या निमित्ताने स्वतः साठी वेळ देतात असेही बालेवाडी विमेन्स क्लब च्या संस्थापक व अध्यक्षा प्रा. रुपालीताई सागर बालवडकर यांनी सांगितले. क्लब च्या माध्यमातून वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम पार पाडले जातात. समाजातील खऱ्या अर्थाने गरजूना विविध प्रकलपांच्या माध्यमातून मदत केली जाते. महिलांनी वर्षभर मानसिक आणि शारीरिक रित्या तंदुरुस्त राहावे म्हणून योग, ध्यान शिबीर, झूम्बा ,मॅरेथॉन असे अनेक उपक्रम राबविले जातात .

अनेक महिलांच्या ठायी असलेल्या कला आणि व्यापार कौशल्य यांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या वर्षी माधवी नाईक, अरुणा चंद्रा, किरण गायकवाड, रितू लोखंडे, इक्बाल कौर राणा, सारिका थिंगळे, माधवी गरुड, डॉ अंजली देशपांडे, स्वाती देवळे, अस्मिता करंदीकर, शिल्पा राजपूत, डॉ आसावरी मांजरेकर, दीप्ती पापरकर यांना यांचा विशेष गौरव करण्यात आला.

ह्या वर्षी लहान मुलांसाठी देखील क्रिकेट प्रीमियर लीग आयोजित केली असून त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सदर स्पर्धेचे उदघाट्न सी एम इंटरनॅशनल स्कुल च्या ढोल ताशा च्या गजरात उत्सहात पार पडले.

See also  बाणेर येथील श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलचा फी मध्ये 30 टक्के कपात करण्याचा निर्णय जाहीर

महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी विविध खेळ घेऊन बक्षीस देखील देण्यात आले. क्लब च्या विविध सदस्यांनी आपल्या स्टॉल च्या माध्यमातून परिसरातील अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतले.