खडकीत गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची एक कोटी ४४ लाखांला घातला गंडा

0
slider_4552

खडकी :

शासकीय ठेका गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची एक कोटी ४३ लाख ७५ हजार रुपयांला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका महिलेने खडकी स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी प्रमुख संशयित सत्यम जोशी सह देविका सत्यम जोशी, राहुल एरंडवणे, हर्षल चौधरी, कुलदीप कदम, वैभव इंगवले अशी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीससूत्रानुसार तक्रारदार महिला खडकीतील औंध येथे राहिला असून आरोपींची आणि तक्रारदार यांची ४ वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्या वेळी आरोपींनी आमच्या कंपनीला शासकीय कामाचा ठेका मिळाला आहे. या कामात गुंतवणूक केल्यास दरमहा ६ ते १२ टक्के व्याज देण्यात येईल, अशी बतावणी केली.

त्यानंतर आरोपींनी महिलेकडून वेळोवेळी एक कोटी ४३ लाख ७५ हजार रुपये घेतले. महिलेने पैसे गुंतविल्यानंतर सुरुवातीला काही रक्कम परताव्यापोटी देण्यात आली. त्यानंतर महिलेला परतावा देण्यात आला नाही. परतावा न मिळाल्याने आरोपींकडे गुंतविलेली रक्कम परत मागितली. तेव्हा आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीसांकडे तक्रार अर्ज केला होता़. याबाबत अधिक तपास खडकी पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले करीत आहे.

See also  औंध येथील जगदंब ढोल ताशा पथकाच्या सरावाला सुरुवात.