औंध येथील जगदंब ढोल ताशा पथकाच्या सरावाला सुरुवात.

0
slider_4552

औंध :

औंध येथील पहिले ढोल ताशा पथक म्हणून प्रसिद्ध असलेल्या जगदंब ढोल ताशा पथकाचा सराव शुभारंभ रविवार दि ०३/०७/२०२२ रोजी औंधगाव विश्वस्त मंडळ अध्यक्ष योगेश जूनवणे, खजिनदार हेरंब कलापूरे, विश्वस्त राहुल गायकवाड, महेंद्र जूनवणे, मॅकन्यूज चे अर्जुन पसाले, पुढारी चे मोहसिन शेख यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पूतळ्यास पुष्पहार अर्पण करुन, ढोल ताशा पूजन करुन व नारळ फोडुन करण्यात आला. आणि औंध गावामध्ये धोल ताशा पथकाच्या सरावाचा आवाज घुमला.

हे ढोल ताशा पथक केवळ केवळ ढोल ताशा वाजवत नसून मागील अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवित आहे. अवघ्या १ ढोल व १ ताशा पासुन सुरु झालेल्या खेळाची सुरूवात १५ ॲागस्त २०१० साली औंध गावातील पहिले पथक म्हणून झाली, पथक म्हणुन वादन करत असताना  अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा राबवण्यात आले या मध्ये विशेषतः १२ जाने २०१३ स्वामी विवेकनंद १५० व्या जयंती निम्मीत संकल्प करू पथकाने भव्य रक्तदान शिबीर घेतले त्याला जोरदार प्रतीसाद भेटला. पथकातील वादक व त्यांचा मित्रांसाठी करियर मार्गदर्शनासाठी कार्यक्रम घेतला.

गणपती विसर्जना नंतर नदी पात्रात पडलेल्या बाप्पांचे योग्य पद्धतीने विसर्जन करणे. सामाजिक संस्था मार्फ़त लहान मुलांना दप्तर वाटप करणे. कोविड काळात जगदंब हेल्पींग हॅन्डस्  च्या माध्यमातुन गरिब लोकांना एका शाळेत रोज १ महिना चहा बिस्कीट वाटप केले, वस्ती भागातील लोकांना दरारोज 200-300 लोकांना फुड पॅकेट वाटप, करोना काळात घरात रहाण्यासाठी जनजागृती, गांधी जयंती निम्मीत ३०१ लोकांनचे लसीकरण शिबीर राबवले,
बाणेर टेकडी येथे वसुंधरा आभियाना हातभार लावला, तिकोणा सर करून तिथे नविन भगवा ध्वज लावला, १२ वर्ष शिवजयंतीला पथका कडुन गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला हार आर्पण करण्यात येतो आणि पुढे पण करण्यात येईल.गरूडझेप (आगरा ते रायगड) मोहीमचे शिलेदार निखिल गोळे यांचा सत्कार करण्यात आला.

See also  आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन मानवतकर यांच्या वतीने औंध - बालेवाडी मधील सफाई कामगारांना भेटवस्तू व मिठाई वाटप.

वर्धापन दिनाच्या दिवशी अनाथ आश्रमांनला खाऊ वाट करण्यात येतो, निर्सग चक्रीवादळ दापोली येथे पथकाकडुन मदत केली गेली. मागील ३-४ वर्ष दिवाळी काळात त्रिपुरारी पौर्णिमे च्या दिवशी दिपोत्सव साजरा करून नदी स्वच्छ व प्रदुषन मुक्त पुणे चा संदेश देत पथक असे अनेक सामाजीक कार्यक्रम राबवत आहे.

आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या जगदंब ढोल ताशा पथकाचा आवज पुणे आणि इतर परीसरात घुमतो आहे आणि औंध गावाच्या नावलौकिकात भर टाकत आहे.