बालेवाडी :
पुण्यातील राजाभाऊ गुडदे फाऊंडेशनचा पहिला वर्धापन दिनानिमित्त बालेवाडी येथे १ जुलै रोजी वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त गुडदे फाऊंडेशनने १०० ते १५० झाडे लावण्याच्या उपक्रमाला सुरूवात केली आहे. गुडदे फाऊंडेशन च्या वतीने नेहमीच विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जात असतात.
या उपक्रमाचे उद्धघाटन बाबुराव चौथमल v शोभा चौथमल यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला राजाभाऊ गुडदे फाऊंडेशनच्या अध्यक्षा किरण संगीत गुडदे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.