बाणेर :
वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन पुणे आयोजित सहकारअभ्यासदौऱ्या अंतर्गत मिलानो कोका उत्तर इटली विद्यापीठातील व्यावसायिक कायद्याचे प्राध्यापक इमानूएला क्युसा यांनी योगीराज पतसंस्थेला भेट दिली. त्यांचा सन्मान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांच्या शुभहस्ते संस्थेच्या वतीने करण्यातआला.




याप्रसंगी ज्ञानेश्वर तापकीर यांनी संस्थेची आर्थिक प्रगती कशी झाली तसेच संस्था राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती सांगितली. संस्था करीत असलेल्या चांगल्या कामाची दखल अंतरराष्ट्रीय पातळीवर घेत इतर देशाचे पदाधिकारी संस्थेच्या कामाचा अभ्यास करण्यासाठी आले याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे असेही यावेळी सांगितले.
इटली च्या इमानूएला क्युसा यांनी सांगितले की, इटली आणि भारतातील सहकार यामध्ये खूप भिन्नता आहे. भारतातील सहकार खरोखर सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखा आहे. योगीराज सारखी संस्था सर्व सामान्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे, हे कौतुकास्पद आहे. पतसंस्थेने नफा कमविण्या बरोबरच सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे कौतुक केले.
याप्रसंगी उद्योजक प्रदीप मिस्त्री, वामनीकॉमच्या रिसर्च ऑफिसर स्मिता कदम, योगीराज पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके तसेच सर्व स्टाफ उपस्थित होता.
संस्थेचे माजी संचालक अमर लोंढे यांनी इटली च्या प्रतिनिधी यांना संस्थेची इत्यंभूत माहिती दिली तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि आलेल्या सर्वांचे आभार मानले.








