बालेवाडी :
सी एम इंटरनॅशनल स्कूल, बालेवाडीच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवण्याचे काम नववीच्या आरना सिंधव, श्रीनीधी कुलकर्णी आणि शर्वरी माने यांनी केली आहे. यांची ऑस्ट्रियातील एक प्रतिष्ठित प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. ही बाब शाळेसाठी अत्यंत गौरवास्पद असल्याचे डॉ. सागर बालवडकर यांनी सांगितले.
हे प्रशिक्षण शिबिर TV9 न्यूज चॅनेलने प्रायोजित केले आहे, आणि सी एम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मुंबईतील राज्य चाचण्या आणि दिल्लीतील राष्ट्रीय चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून हे महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे.
भारतातील १५,००० शाळांमधून आणि ५०,००० इच्छुक खेळाडूंपैकी, देशभरातून फक्त २८ मुले आणि मुलींची निवड झाली आहे. आणि त्यापैकी सीएम स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी या ७ दिवसांच्या खास प्रशिक्षण शिबिरात सी एम इंटरनॅशनल शाळेचे अभिमानाने प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवली आहे.
तसेच, या विशेष क्षणी, विद्यार्थ्यांना नवी दिल्लीतील एक प्रमुख घटक म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. जे त्यांच्या ऑस्ट्रियातील प्रशिक्षणासाठी रवाना होण्याआधी त्यांना दिले गेले. शाळेचे समर्पित प्रशिक्षक आशिष कटरा , मनोहर पाटील यांचे अथक मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले.
एसकेपी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव बालवडकर, सचिव डॉ. सागर बालवडकर, प्रा.रुपाली सागर बालवडकर, आणि सी.एम. इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या इकबाल कौर राणा यांनी विद्यार्थीनिंना प्रोत्साहित करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.