मुसळधार पावसाने उन्हाळ्यात दिला दिलासा… परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षित कामामुळे नागरिकांची तारांबळ…!

0
slider_4552

पाषाण :

औंध, बाणेर, पाषाण, सुतारवाडी परिसरामध्ये गुरुवारी चार वाजता मुसळधार पावसाने हजेरी लावली. साधारणता दोन तास चाललेले या पावसाने उन्हापासून दिलासा दिला. तर प्रशासनाच्या दुर्लक्षित व रखडलेल्या कामामुळे मात्र नागरिकांची चांगली तारांबळ उडाली.

पाषाण/ सुतारवाडी :

पाषाण सुस रोड येथील पावसाळी लाईनचे काम करून देखील ही, या ठिकाणी रस्त्याला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. बालाजी चौकातील ड्रेनेज तुंबून पुन्हा वाहू लागल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीची झाल्याची पहावयास मिळाली.

सुतारवाडी येथील गेल्या काही महिन्या पासून सुरू असलेल्या ड्रेनेजच्या कामाचेही पोलखोल या पावसाने केली. सुतारवाडी स्मशान भूमी त पाणी साचत असल्याने या ड्रेनेज लाईनचे काम करण्यात आले. परंतु पहिल्याच पावसाळ्यामध्ये पुन्हा सुतारवाडीतील स्मशानभूमी पाणी शिरल्याचे दिसून आले. यामुळे या ड्रेनेज लाईनचे काम कितपत योग्य झाले आहे, असा प्रश्न सुतारवाडीतील नागरिकांना पडला आहे.

सुतारवाडी येथील लक्ष्मी धाम सोसायटी मागील परिसरामध्येही असलेले ड्रेनेज लाईन मधूनही पाणी बाहेर वाहत असल्याने या ठिकाणी वरील नागरिकांनाही पावसाळ्यात घान पाण्यातून चालत आपल्या घरापर्यंत पोहोचावे लागले. लक्ष्मी धाम सोसायटी मागील वारंवार तक्रार येत असल्याने या ठिकाणी ठोस पावले उचलून ही ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.

बाणेर / बालेवाडी :

बाणेर बालेवाडी रोड वरील ओढे बुजवल्याने शिवनेरी पार्क या ठिकाणीही अनेक वेळा कामे करूनही दरवर्षी पाणी साचते. याही वेळेस पहिल्याच मुसळधार पावसाने या ठिकाणी पाणी साचले असून विजेचा डीपीचा फिडर पाण्यात गेला आहे. यामुळे अनेक वेळा अंधारात राहण्याचीही प्रसंग येथील नागरिकांवर ओढावतो. गेल्या चार वर्षांपासून पाणी साठण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आजूबाजूचे नागरिक सर्व महानगरपालिकेचा तक्रार करत आहेत. पण अजूनही काही उपायोजना केल्या नसल्याचे येथील स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

याचबरोबर बाणेर बालेवाडीत अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. अनेक रस्ते पाणी साचल्यामुळे बंद झाले. नागरिकांना वाहतूक कोंडी मध्ये पावसात अडकावे लागले. स्मार्ट सिटी च्या नावाखाली केलेल्या कामाची पहिल्याच पावसाळ्यात प्रशासनाची परीक्षा घेतली असल्याची लक्षात घेत आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे आता तरी लक्ष देऊन पूर्ण होणार का याकडे मात्र सर्व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

See also  निरंकारी बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाषाण बाणेर लिंक रोड या ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान !