गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकरांची १३४ वी जयंती साजरी

0
slider_4552

पुणे :

गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकरांची १३४ वी जयंती व्याख्यानाने साजरी करण्यात आली.यावेळी डाॅ रवींद्र क्षीरसागर यांनी व्याख्यान दिले. कार्यक्रमाची सुरवात डाॅ रवींद्र क्षीरसागर व डाॅ महेंद्र वाघमारे यांनी केलेल्या बुध्दवंदनेने झाली.

या नंतर डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उलगडताना डाॅ रवींद्र क्षिरसागर म्हणाले,” अंदाजे ६५ वर्षाची या महामानवाची कारकीर्द आहे. त्यांनी चालविलेला वैचारिक वारसा हा महात्मा फुलेंपासुन चालत आलेला आहे. अखंड शिक्षणाचा प्रवास करुन त्यांनी फक्त समाजासाठी शैक्षणिक वारसा जपला.त्यांना आपण कुठल्याही चौकटीत बांधता कामा नये. न्याय, समता, बंधुता हे तीन लोकशाहीचे स्तंभ आहेत तसेच स्त्री शिक्षण हाही एक मोठा पाया आहे. याचा कायम आम्ही आदर करु. तसेच स्त्री शिक्षणाची कास धरणार्या सावित्रीबाई फुले यांचे नाव असलेल्या विद्यापीठाचे आपण भाग आहेत हे अभिमानाचे आहे.

या प्रसंगी प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी वेगवेगळे कायदे हे स्थित्यंतराचे प्रतिक आहेत. देश स्वतंत्र होण्यासाठी घटना गरजेची होती. आणि राजकिय, सामाजिक आणि कायदेशीर स्थिरतेमागे या महामानवाचा महत्वाचा वाटा आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे समन्वय डाॅ. संगिता ढमढेरे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्वांचा प्रतिसाद मिळाला.

See also  प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल.