औंधगाव ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज उत्सव २०२५  उत्साहात साजरा

0
slider_4552

औंध :

औंध येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे भैरवनाथ महाराज यांचा अभिषेक ऍड. अशोक रानवडे पाटील यांच्या हस्ते झाला. दुपारी विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी, एकता महिला भजनी मंडळाचे सुश्राव्य भजन झाले. संध्याकाळी दर्शनासाठी आलेल्या मान्यवरांचा पानसुपारी देऊन सन्मान करण्यात आला.

रात्री औंधगाव भजनी मंडळाचे भजन, नगारा वादन, ढोल ताशा पथके, बँडपथक याच्या गजरात व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थ, विश्वस्त, आसामधनी, खांदेकरी व भाविकांच्या उपस्थितीत पालखीची ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली.

औंधगाव विश्वस्त मंडळाने दि. ११ मे २०२५ ते १६ मे २०२५ सलग सहा दिवस त्यामध्ये प्रामुख्याने छबिना, कुस्ती आखाडा, औंधगाव विश्वस्त मंडळ व अभिजित गायकवाड – संस्थापक अध्यक्ष द औंध सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त आयोजित खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम, युवा नेते सचिन मानवतकर संयुक्त विद्यमानाने आयोजित सायली पाटील यांचा डान्स शो, माजी नगरसेवक कैलासदादा गायकवाड संयुक्त विद्यमानाने आयोजित लावण्या चंद्रा लावणी कार्यक्रम, माजी नगरसेवक सनी दादा निम्हण संयुक्त विद्यमानाने आयोजित बाळगोपाळांसाठी बालमेळावा असे अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन औंधगाव विश्वस्त मंडळ व औंध कुस्ती केंद्र यांनी केले होते. प्रथम चार क्रमांकाची बक्षिसे युवा नेते जयेश संजय मुरकुटे कार्यध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट कोथरूड , माजी नगरसेवक दत्ताबापु बहिरट, प्रकाशतात्या बालवडकर( प्रभारी सहकार आघाडी भाजपा पुणे शहर ) व युवा नेते राहुल दादा बालवडकर (उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहर) यांनी दिली. यावेळी एकूण ४० कुस्त्या झाल्या. एकूण ५. ५० लाख रुपयांची बक्षीसे देण्यात आली.

पै. शिवराज राक्षे ( डबल महाराष्ट्र केसरी) यांनी “औंध केसरी” चा ‘किताब पटकावला. याप्रसंगी नामदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरआण्णा मोहोळ, आमदार सिद्धार्थदादा शिरोळे व अनेक आजी-माजी नगरसेवक, मान्यवर , आवर्जून उपस्थित होते.

See also  रेशनिंगच्या दुकानासमोर लाकडी दांडक्याने मारहाण : औंध मधील प्रकार.

औंधगाव विश्वस्त मंडळ अध्यक्ष राहुल प्र. गायकवाड, सेक्रेटरी गिरीश जुनवणे, खजिनदार हेरंब कलापुरे, विश्वस्त योगेश जुनवणे , महेंद्र जुनवणे, विकास गायकवाड, सागर गायकवाड, सुप्रिम चोंधे, विलास रानवडे, ऍड.सुशिल लोणकर, सोपान राऊत, सल्लागार रणजित कलापुरे, सुनिल गायकवाड, सचिन रानवडे, आनंद जुनवणे, गणेश कलापुरे, राहुल दि. गायकवाड, ज्ञानेश्वर जुनवणे, ऍड. सुनिल गायकवाड, विशाल शिंदे व मान्यवरांसह कुस्ती शौकिन, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.