बाणेर :
बाणेर मधील जुपिटर हॉस्पिटल ते बालेवाडी फाट्यापर्यंत असलेल्या रस्त्यावर पदपथ खोदण्यात आल्याने नागरिकांनी चालायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील पदपथ वारंवार खोदकाम केल्याने दुरावस्था झालीच आहे, पण त्यावरील ब्लॉकही पदपथावर अस्ताव्यस्त पडलेले आहेत. याकडे महापालिका प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात येत आहे.
खोदकाम करू केबल टाकले जातात परंतु तो केबल टाकणारे कशा पद्धतीने केबल टाकतात याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे या ठिकाणी वारंवार पदपथ खोदण्यात येत असल्याचे लक्षात येत आहे. सध्या येथील खोदाईबरोबरच पदपथावरील ब्लॉक काढण्यात आले आहेत व ते अस्ताव्यस्त पद्धतीने टाकण्यात आल्याने नागरिकांना या ठिकाणी चालणेही अशक्य होत आहे. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यात हे ब्लॉक काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आल्याने ही या वाहतूक कोंडी मध्ये भर पडत आहे.
येथील स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील या ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले. गेले दहा ते पंधरा दिवसा पासून हे पद उखडून टाकले आहेत. परंतु हे दुरुस्तीचे काम अद्यापही कोणीही करत नसल्याचे लक्षात येत आहे. पदपथ खोदणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर ते दुरुस्ती करून घेण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. पदापत दुरुस्तीचा दर्जाही अधिकाऱ्यांनी तपासून पहावा अशी मागणी ही होत आहे.
प्रतिक्रिया :: याबाबत पथ विभागाचे संबंधित अधिकारी यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या वतीने हे पदपत दुरुस्तीचे काम सुरू आहे. काही अडचणी आल्याने येथील काम थांबवले होते. तसेच खुदाई करणाऱ्यांवरही नोटीस काढली असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.