के वाय सी साठी गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयातील फ्युचर बँकर्स फोरमने केली जनजागृती…

0
slider_4552

पुणे :

गणेशखिंड येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालयातील फ्युचर बँकर्स फोरमने गेल्या काही वर्षात अनेक उपक्रम घेतले आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकने महाविद्यालयाला ‘आर्थिक साक्षरता केंद्र ‘ मान्यता दिली आहे. त्या अंतर्गत महाविद्यालय आर्थिक साक्षरते साठी हा पुणे, सातारा आणि रायगड जिल्ह्यातील उपक्रम आहे.

भारतीय रिझर्व्ह बॅंक वित्तीय समावेशन व विकास विभाग यांनी के.वाय.सी: तुमचे सुरक्षित बँकेकडे पाहिले पाऊल या संकल्पनेवर आधारित ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी या दरम्यान आर्थिक साक्षरता आठवडा जाहीर केला होता. के.वाय.सी चे महत्व, कार्यपद्धत, करताना घ्यावी लागणारी दक्षता याबद्दल जनजागृती करण्यासाठी भारतीय रिझर्व बँक FIDD या विभागाने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड यांना महाराष्ट्रातील विविध सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य घेण्यासाठी जबाबदारी दिली होती.

फ्युचर बॅंकिंग च्या बॅंक मित्र स्वयंसेवकांनी एकूण १२ पथनाट्य केली. रायगड जिल्ह्यातील ४ ठिकाणी, पुणे जिल्ह्यातील ४ तर सातारा जिल्ह्यात ४ ठिकाणी पथनाट्य सादर केली. मॉडर्न महाविद्यालयातील बँक मित्र स्वयंसेवकांनी एस टी बस स्टँड, देवस्थान, पर्यटन स्थळ, बाजारपेठ, आठवडे बाजार, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, महाविद्यालय, पालखी सोहळा अशा विविध ठिकाणी चार अंकी पथनाट्य घेऊन के.वाय.सी संदर्भात जनजागृती केली.

या उपक्रमास माननीय सदानंद दीक्षित माजी निवृत्त बॅंक अधिकारी यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रा.अदिती पिंपळे यांनी पथनाट्याची संहिता लिहिली. या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन प्रा.विजयालक्ष्मी कुलकर्णी व डॉ.मंजुषा कुलकर्णी यांनी केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय खरात तर उपप्राचार्या डॉ. शुभांगी जोशी यांनी सहकार्य केले.

तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाह डॉ. ज्योस्ना एकबोटे, व कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

See also  पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या विविध प्रकल्पांच्या निषेधार्थ पुण्यातील पर्यावरण संस्थांनी 'परिवर्तन दूत' पुरस्कार केले परत.RFD वृक्षतोडीच्या विरोधात 'चलो चिपको' आंदोलनाची घोषणा करत 'जनसुनावणी'