मॉडर्न महाविद्यालय गणेश खिंड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

0
slider_4552

पुणे :

गणेशखिंड येथील प्रोग्रेसव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालया मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी एकत्रीपणे या कार्यक्रमाचे संयोजन केले. प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. आ. मो. जोशी जे भारतीय स्टेट बँकेमध्ये तीस वर्ष कार्यरत होते, ज्यांचे मासिके व नियत कालिका यामधून आजपर्यंत 200 पेक्षा अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, योद्धा म्हणून महाराजांचे कार्य असा संपूर्ण जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. याच बरोबर महाराष्ट्रातील 12 किल्ले जे ऐतिहासिक वारसा म्हणून जाहीर झाले आहेत त्याच्या इतिहासाची माहिती दिली.

कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी एच. व्ही देसाई महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गणेश राऊत होते. त्यांनी ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन व कार्य आणि हेरिटेज वॉक या विषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. इतिहासाचे प्राध्यक किशोर मोरे यांनी पाहुण्यांचे परिचय करून दिले. महाराजांची आरती ऋतुज चांदेकर,पोवाडा स्वयं नाजरें तर पारंपरिक खेळ या मध्ये सानिका खराडे, संजना दाबके व साहिल जाधव हे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमांच्या आयोजनात सारंग जोशी, अथर्व जोशी, क्षितज गुर्जर, अरीन होनप साहिल जाधव यांनी मदत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार कला शाखेचे उप प्राचार्य डॉ. ज्योती गगनग्रास यांनी केले

तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाह डॉ. ज्योस्ना एकबोटे, व कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

See also  पीएमआरडीएच्या अधिकारक्षेत्रासाठी आकाशचिन्ह धोरण (होर्डिंग पॅालिसी ) प्रशिद्ध ...