घड्याळाशी बांधिलकी असल्याने जे सोबत येतील त्यांना समावेश करुन घेवू : बाबुराव चांदेरे

0
slider_4552

बाणेर :

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक ९ च्या वतीने दि.१३/२/२०२१ रोजी धनकुडे फार्म येथे हळदी कुंकू समारंभ घेण्यात आला या समारंभास नगरसेवक बाबुराव चांदेरे, दीपाली धुमाळ विरोधी पक्षनेते, अश्विनी कदम मा. स्थायी समिती अध्यक्ष, सागर बालवडकर, मनोज बालवडकर, विशाल विधाते, नितीन कळमकर, समीर चांदेरे, किरण चांदेरे, ज्योती सूर्यवंशी, ऋतिका राजे महाडिक, संगीता मोहोळ, रुपाली बालवडकर, सरला चांदेरे, प्रेमलता जैन, शिल्पा कळमकर आदि मान्यवर तसेच प्रभागातील बहुसंख्य महीला वर्ग उपस्थित होते. पूनम विधाते यांनी प्रस्तावना केली, हळदीकुंकू व महिलांचे महत्व सांगितले,

यावेळी बोलतांना स्थायी समितीच्या मा. अध्यक्ष अश्विनी कदम म्हंटले की, नगरसेवक बाबुराव चांदेरे हे नेहमी सहकार्याच्या भूमिकेत असतात. त्यांनी बाणेर चा विकास सूरेख केला आहे त्यामुळे बाणेर चा स्मार्ट सिटी मध्ये दुसरा नंबर आला. तसेच विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी महिलांनी लक्ष दिले तर सगळे बदलते त्यामुळे महिलांचे महत्व खूप आहे. महिलांनी ठरवेल तर सगळे काही घडू शकते.

यावेळी बाबुराव चांदेरे यांनी म्हंटले की, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वांना समावेश करुन घेण्याची पद्धत आहे. घड्याळाशी बांधिलकी असल्याने जे सोबत येतील त्यांना समावेश करुन घेवू. सत्ता नसताना देखील नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही विविध कार्यक्रम प्रभाग मध्ये नेहमी घेतो. विशाल विधाते यांनी सर्वांचे आभार मानून राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असे सांगीतले.

See also  कृष्णगंगा सोशल फाऊंडेशन च्या वतीने ४८५ नागरिकांचे लसीकरण.